Ration card : नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण रेशन कार्ड संदर्भातील महत्त्वाची एक गोष्ट जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे रेशन कार्ड हे एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. रेशन कार्डद्वारे आपण वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकतो. त्याच रेशन कार्ड मध्ये आपल्याला नवीन नाव जोडायचा असेल तर आपण कसे जोडू शकतो याचा विचार आपण एकदा अनेकदा करतो. त्यातच सोल्युशन म्हणून आम्ही आजच्या पोस्टमध्ये रेशन कार्ड मध्ये नवीन नाव कसे जोडायचे याबद्दल माहिती सांगणार आहोत त्यामुळे ही माहिती तुम्ही संपूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की रेशन कार्ड मध्ये नवीन नाव कसे जोडले जातात. Ration Card new name add on

मित्रांनो आपले केंद्र सरकार गरीब लोकांसाठी रेशन देते प्रधानमंत्री रेशन धान्य योजनेअंतर्गत आपल्या देशातील सुमारे 80 कोटी लोकांना रेशन धान्य देते. मित्रांनो ही योजना 2020-22 पासून लागू करण्यात आलेली आहे.
मित्रांनो घरामध्ये नवीन मूल जन्माला आले किंवा घरामध्ये एक नवीन नागरिकाला की त्याचा रेशन कार्ड मध्ये नाव जोडणे गरजेचे असतं पण तुम्हाला हे माहित पाहिजे की तुम्ही घरी बसल्या बसल्या रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडू शकता यासाठी मित्रांनो तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहोत त्या गोष्टी तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण केल्या त्यानंतर तुम्ही नवीन नाव जोडू शकणार आहात. Ration card update
नवीन जन्माला आलेल्या मुलाचं नाव जोडण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे
- मुलाचे जन्मचे प्रमाणपत्र
- पलकांचा आयडी पुरावा
- कुटुंबात वधूचे नाव जोडण्यासाठी दस्तऐवज
- विवाह प्रमाणपत्र
- पतीचे मूळ रेशन कार्ड
- पालकांच्या रेशनकार्डमधून नाव वगळल्याचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
नवीन नाव जोडण्याच्या स्टेप्स
- यासाठी मित्रांनो तुम्हाला अन्न व पुरवठा या सरकारी अधिकृत वेबसाईटवर व्हिजिट करायचा आहे.
- त्याच्यानंतर तुमच्या पुढे त्या वेबसाईट चे होम पेज उघडेल.
- तुम्ही जर वेबसाईटवर पहिल्यांदीच लॉगिन झालेला असाल तर तुम्हाला युजर आयडी पासवर्ड टाकून पुन्हा लॉगिन व्हायचं आहे.
- यानंतर पुढे तुम्हाला सदस्याचे नाव जोडा असं एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.
- ते झाल्यानंतर तुम्हाला तेथे एक नवीन फॉर्म खोलेल तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्यामध्ये जी माहिती विचारली आहे ती टाकायची आहे.
- रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडण्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र किंवा निवासी प्रमाणपत्र किंवा विवाहाची निमंत्रण पत्रिका गरजेचे असणार आहे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वेबसाईटवर कागदपत्रांची संपूर्ण यादी दिली असून तिथून तुम्ही तुमची कागदपत्रे अपलोड करू शकता.
- त्यानंतर तुम्ही सबमिट क्लिक करून अर्ज पाठवू शकता.
- तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.
- यानंतर 1 महिन्यानंतर तुमचे रेशन कार्ड पोस्टाने घरी येईल.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव जोडू शकतात ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अशीच माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.