Pm Kisan New Update : पी एम किसान योजनेत पात्र अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली

PM Kisan news : शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाकडून पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. शेतकऱ्यांच्या हितासाठी एक चांगली योजना ठरलेली आहे, मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात योजना सुरू करण्यात आली महिन्याला पाचशे रुपये चार महिन्याला 2000 आणि वर्षाला सहा हजार अशा पद्धतीने पैसे मिळतात आणि आता त्या योजनेत मोठे बदल करण्यात आलेले आहे. तर काय बदल आहेत ते या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे पोस्ट काळजीपूर्वक वाचा.
नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले स्वागत करतो

योजना : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी-PM Kisan Samman Nidhi
योजनेचा उद्दिष्ट : शेतकऱ्यांना मदत करणे
किती शेतकरी पात्र आहेत : 11 कोटी शेतकरी पात्र आहे
एकूण वार्षिक रक्कम : 6000
हप्ता : २०००
पी एम किसान मदत नंबर help No.
011-24300606, 155261

Kapus bhav today

पाहण्यासाठी येथे क्लिक करून पहा

केंद्र सरकार शेतकऱ्यांना पैसे देत होतं पण त्यातच आता काही सरकारला लुबाडणारे लोक निर्माण झाले आहेत, खोट्या पद्धतीचे कागदपत्र दाखवून पी एम किसान सन्माननिधी योजनेत लोकशामील झाले आहेत. हीच फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने इ केवायसी करणे अनिवार्य केले होते. 28 जानेवारी 2023 ही तारीख शेतकऱ्यांसाठी केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख दिली होती. ही तारीख होण्याच्या आधी शेतकऱ्यांनी केवायसी करणे गरजेचे होते.
पण बऱ्याच शेतकऱ्यांनी ही केवायसी केलेली नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे PM Kisan Samman Nidhi योजनेचे हप्ते पेंडिंग मध्ये पडलेले आहेत.
तर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी e-kyc केलेल्या पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांची आणि ज्या शेतकरी मित्रांनी केवायसी पूर्ण केलेले नाही त्यांचे वेगवेगळ्या लिस्ट करण्यात आलेले आहेत. ज्यांची पूर्ण केवायसी झाली ते पात्र आणि ज्यांची केवायसी पूर्ण झाली नाही ते अपात्र अशी यादी करण्यात आलेली आहे. यादी पाहण्यासाठी तुम्हाला पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पहावा लागणार आहे.

तुमचे नाव यादीत आहे का नाही कसे पहावे

सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे त्याची लिंक इथे आहे.

पी एम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या डॅशबोर मध्ये तुम्हाला स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचा आहे त्यानंतर राज्य ,जिल्हा ,तालुका आणि गाव निवडायचा आहे. आणि सबमिट किंवा कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
ही प्रोसेस केल्यानंतर तुमच्यासमोर बऱ्याच शेतकऱ्यांची यादी येईल त्या यादीमध्ये अपात्र पात्र शेतकऱ्यांची यादी तुम्हाला दिसेल आणि मित्रहो ज्यांच्या आधार प्रमाणे राहिलेत त्यांची सुद्धा यादी तुम्हाला देते दिसेल अशा पद्धतीने तुम्ही पाहिजे आहे.

Crop Insurance :शेतकऱ्यांसाठी खुशखबर

पिक विमा मंजुर,724 कोटी रुपये निधी झाला मंजूर

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi