नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये how to make money on YouTube in Marathi याविषयी जाणून घेणार आहोत.
How to make money on YouTube in Marathi
मित्रांनो तुम्हाला माहित आहे का तुम्ही दररोज युट्युब तर चालवत असाल, पण मित्रांनो ही युट्युब वरचे व्हिडिओज तुम्ही पाहता. ते क्रियेटर का बनवत असतील त्यांचा त्यापासून काय फायदा होतो. याचा विचार तुम्ही केलाच असणार आहे. तर या पोस्टमध्ये तुम्हाला घरी बसल्या बसल्या तुम्ही गृहिणी असाल, किंवा टीचर असाल, किंवा बेरोजगार असाल तर युट्युब च्या साह्याने तुम्ही चांगले (Make money online )पैसे कमवू शकता. तरी युट्युब चॅनेल कसे तयार करायचं व्हिडिओज कसे बनवायचे ही संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिली आहे त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा.

युट्युब वर पैसे कमवण्यासाठी येथे क्लिक करा
How to make YouTube channel in Marathi-यूट्यूब चैनल कसे बनवावेत
मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे एक चैनल तयार करावे लागेल. तर तुम्ही म्हणतार चैनल कसे तयार करायचे. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कसे चैनल तयार करू शकता हे सांगतो.
यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम एक ईमेल आयडी (email ID)असणे गरजेचे आहे. शक्यतो सर्वांकडेच ईमेल आयडी असते. ईमेल आयडी म्हणजेच गुगल अकाउंट. तर मित्रांनो तुम्ही तर दररोज युट्युब चालवता. चला तर बघूया स्टेप बाय स्टेप चैनल कसे तयार करावे.
- युट्युब ॲप ओपन करायचे आहे, आणि सर्वात वरती कोपऱ्याला उजव्या साईटला प्रोफाईल (profile) या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.
- प्रोफाइल या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर. तेथे क्रियेट चैनल(create channel) असं ऑप्शन दिसेल, तेथे क्लिक करा तेथे क्लिक केल्यानंतर तुमच्या चैनल चा एक नाव द्यावे लागेल. मग तुम्हाला जे चॅनलचं नाव ठेवायचं आहे ते देऊ शकता किंवा स्वतःच नाव देऊ शकता.
- मित्रांनो तुम्ही तुमच्या चैनल साठी एक लोगो बनवून घेऊ शकता तुम्हाला स्वतःला बनवायचा असेल तर पिक्सलॅब (pixel lab-PicsArt) किंवा पिक्स आर्ट एप्लीकेशनच्या साह्याने बनवू शकता. (अधिक माहितीसाठी यूट्यूब चैनल लोगो कसा बनवतात युट्युब ला सर्च करून व्हिडिओ पहा) अनिल लोगो बनवून तेथे अपलोड लोगोच्या जागी अपलोड करा
- आणि त्यानंतर खाली क्रिएट (create channel) चैनल यावर क्लिक करायचा आहे.
आणि मित्रहो तुमचे चैनल तयार झालेले आहे.
युट्युब वर पैसे कमवण्यासाठी येथे क्लिक करा
युट्युब वर व्हिडिओ अपलोड कसे करावे-how to upload YouTube video
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये युट्युब ॲप ओपन करायचा आहे. ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली एकदम मध्ये एक प्लस (+) लोगो दिसेल. म्हणजेच प्लस आयकॉन त्यावरती क्लिक करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. Create short, go live, upload video, create post एवढे ऑप्शन दिसतील. या ऑप्शन मधील अपलोड व्हिडिओ (upload video)या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
त्यानंतर तुमच्या मोबाईल मधील व्हिडिओ तुमच्यासमोर येतील मग तुम्हाला जो व्हिडिओ अपलोड करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचा आहे, यानंतर तुमच्या व्हिडिओचा टायटल (title) द्यायचा आहे. टायटल मध्ये तुमचा व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे ते द्यायचा आहे. त्याखाली व्हिडिओ बद्दल माहिती द्यायची आहे. आणि visibility मध्ये पब्लिक हे ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि अपलोड upload या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे. तुमचा व्हिडिओ हा अपलोड व्हायला लागेल तुमच्या इंटरनेटच्या स्पीड च्या अनुसार आणि व्हिडिओच्या साईजच्यानुसार वेळ लागू शकतो. या पद्धतीने तुम्ही युट्युब वर व्हिडिओ अपलोड करू शकता.
युट्युब व्हिडिओला युज किती आले लाईक किती आल्या कशा पहाव्यात-how to install YT studio app
यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वर जायचं आहे आणि वाय टी स्टुडिओ (YT STUDIO) नावाचा ॲप डाऊनलोड करायचा आहे. या ॲप मधून तुम्ही सर्व काही तुमच्या मोबाईलच्या साह्याने मॅनेज करू शकता. काय काय करू शकता हे पहा
तुम्ही तुमच्या व्हिडिओ बद्दल माहिती बदलू शकता.
तुमचा व्हिडिओ डिलीट करू शकता
तुमच्या व्हिडिओच्या कमेंट ला उत्तर देऊ शकता
तुमचा व्हिडिओ ला किती जणांनी पाहिले किती जणांनी लाईक केल्या किती कमाई झाली. किती वॉच टाईम मिळाला. अशा बऱ्याच गोष्टीबद्दल माहिती जाणून घेऊ शकता.
यूट्यूब चैनल वर न्यूज कसे मिळवावे आणि सबस्क्राईब वर कसे मिळवावे
मित्रांनो सुरुवातीला तुमच्या चॅनलवर व्हिडिओ कोणी पाहणार नाही म्हणजेच तुमच्या चैनल बद्दल अजून कोणाला माहित नाही. तर सुरुवातीला तुम्ही तुमच्या ज्या विषयावर चॅनल आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवायला सुरू केल्यानंतर. तुम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर स्वतः तुमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ पाहू शकता. किंवा तुमच्या घरात दोन-तीन मोबाईल असतील त्या मोबाईल ने देखील तुम्ही व्हिडिओ पहा. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. किंवा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा. सुरुवातीला तुम्ही तुमच्या चैनल ची काही ऑडियन्स तयार करा मग जसे तुमचे चाळीस-पन्नास views यायला सुरुवात होईल मग हळूहळू तुमचे सबस्क्राईब करा तुम्ही शेअर नाही केलं तरी चालेल.
youtube च्या साह्याने पैसे कमवायचे नियम व अटी-YouTube channel make money Trums and condition
मित्रांनो युट्युब वर पैसे कमवण्यासाठी काही नियम देखील आहेत. हे तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो तुम्ही कोणाचाही व्हिडिओ तुमच्या चॅनलवर टाकू शकत नाही ही सर्वात महत्त्वाची अट आहे. म्हणजेच तुम्ही स्वतःच व्हिडिओ बनवून टाकायचे आहे आणि त्या व्हिडिओमध्ये कोणतही म्युझिक वापरायचं नाही कोणतही म्हणजे दुसऱ्याचे म्युझिक. तुम्ही युट्युब चे म्युझिक वापरू शकता युट्युब स्वतः देखील काही म्युझिक देते.
अजून म्हणजे तुम्ही लोकांना फसवू शकत नाही म्हणजेच व्हिडिओ मध्ये जे तुम्ही सांगाल ते खरी माहिती असणे गरजेचे आहे. जर तुम्ही खोटी माहिती टाकून लोकांना फसवत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही.
युट्युब वर पैसे कमवण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो अशाच पोस्ट वाचण्यासाठी आमच्या इंडियन मराठी या ब्लॉगला नक्की भेट देत जा धन्यवाद.
1 thought on “Make money on YouTube: घरी बसून युट्युब द्वारे कमवा लाखो रुपये, संपूर्ण माहिती पहा”