50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान
नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे सर्वच बँकांना या दिवशी सूचना करण्यात आलेल्या आहेत की 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा करावे तर शेतकरी मित्रांनो रेगुलर कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदानाचा लाभ देण्याचे राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या बाबीसाठी राज्य सरकारचे तब्बल 4700 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सहकार विभागांना आणि बँकांच्या अधिकाऱ्यांना 5 सप्टेंबर 2022 पासून या गोष्टीवर काम करावं असं सांगण्यात आलेला आहे.
तर शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले परंतु बरेच शेतकरी नियमित कर्ज फेड करून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे.
असे शेतकरी जे नियमितपणे कर्जफेड करतात त्यांच्यासाठी ही आनंददायी बातमी ठरत आहे.
घोषणा तर झाली आहे पण केव्हाच सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा करेल याचीच वाट शेतकरी पाहत आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम जमा व्हायला लागलेली आहे.
ज्या ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांची लिस्ट बँक मध्ये प्रकाशित केली गेलेली आहे. जर तुम्ही नियमित कर्ज फेडत करत असाल आणि तुमचं नाव जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या बँक मध्ये जाऊन नाव पाहू शकता.
शेतकरी मित्रांनो ही माहिती इतरांना देखील शेअर करा इतर शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होईल अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा आम्हाला youtube वर मी तुम्ही सबस्क्राईब करू शकता फेसबुक वर सुद्धा फॉलो करू शकता.