गजकर्ण खाज यावर उपाय | गजकर्ण गायब करण्यासाठी घरगुती पाच उपाय

नमस्कार मित्रांनो त्वचेचे वेगवेगळे आजार आपल्याला नेहमीच होत असतात त्यातलाच एक आजार म्हणजे गजकर्ण तर मित्रांनो गजकर्ण कशामुळे होते . गजकर्ण खाज यावर उपाय काय करावे गजकर्णाला कोणती औषध वापरावी या सर्व मुद्द्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
गजकर्ण मुळे डॉक्टर कडे आपल्या वेळोवेळी फेऱ्या होत असतात. आपले पैसेही देखील त्यामध्ये खर्च होत असतात.
पण असे आपण कमी खर्चात घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्या उपायाने आपले गजकर्ण बरे होण्यास नक्की मदत होईल.

गजकर्ण खाज यावर उपाय

गजकर्ण कशामुळे होते

त्वचेवर घाम जास्त काळ राहिल्यामुळे किंवा सतत त्वचा ओली राहिल्यामुळे आपल्याला वेगवेगळे स्किन प्रॉब्लेम होतात. त्यातलाच एक स्किन इन्फेक्शन म्हणजेच गजकरण तर या गजकर्णावर आपण काय काय घरगुती उपाय करू शकतो यावर आपण आज माहिती घेणार आहोत.

गजकर्ण घरगुती उपाय

हे उपाय गजकर्ण लवकर बर होण्यासाठी आणि गजकर्ण खाज यावर उपाय आहे.

पपई : गजकर्णावर पपई अत्यंत परिणामकारक ठरते. पपई मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते, मित्रांनो दिवसातून दोन ते तीन वेळा पपईचा रस गजकर्ण झालेल्या जागेवर नक्की लावा. पपईच्या बियांचा देखील आपण चूर्ण लेप करून आपल्या गजकर्णाच्या जागी लावू शकतो.

 ट्री ट्री ओईल : तर मित्रांनो गजकर्णावर हे अत्यंत परिणामकारक ठरतं. यात मित्रांनो अँटीसेप्टिक ऑंटी फंगल आणि ऑंटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे मित्रांनो जेथे आपल्याला गजकरण झाले असेल ती जागा अगदी स्वच्छ धुऊन एखाद्या कापसाच्या बोळ्याने ट्री ट्री ओईल लावलं पाहिजे. हे ऑइल आपण दिवसातून चार ते पाच वेळा लावला पाहिजे त्वचा दर संवेदनशील असेल तर खोबरे तेल ऑईलचे काही थेंब घालून तुम्ही लावू शकता.

हळद : तसंच मित्रांनो हळद देखील गजकर्णावर अत्यंत परिणामकारक ठरत आहे. यात अँटिप्लोमॅटिक गुण असल्यामुळे सूज कमी व्हायला मदत होते त्यामुळे आपल्याला लवकर आराम मिळतो, आपण ताज्या हळदीचा रस त्यावर लावू शकतो किंवा हळदीची पूड खोबरे तेलात किंवा पाण्यात मिसळून गजकर्णावर लावू शकतो. हळदीचे पाणी देखील आपल्याला आराम द्यायला मदत करत या गोष्ट मुळे आपल्याला गजकर्णावर लवकर आराम मिळण्यात मदत होईल.

कोरफड : गजकर्ण खाज यावर उपाय आपण या टॉपिक मध्ये जाणून घेतोय.

गजकर्णावर कोरफडीचा रस किंवा एलोवेरा जेल अत्यंत परिणामकारक ठरतं. याने सूज उतरण्यास मदत होते. आणि खाज कमी होण्यास मदत होते आणि थंडावा मिळतो. हे आपण दिवसातून तीन वेळा लावलं पाहिजे. तर मित्रांनो आपण याचबरोबर गजकर्णावर कडुलिंबाचा रस किंवा तुळशीचा रस लावू शकतो. तसेच मोहरी पाण्यात वाटून तिचा लेप देखील आपण लावू शकतो. याने देखील आपल्याला चांगला फायदा होतो. गजकर्णाच्या जागी किंवा चट्ट्याच्या जागी मातीचा लेप लावण्याने देखील चांगल्या स्वरूपाचा फायदा होतो.

तर मित्रांनो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार आणि फळ खाणं चांगलं फायदेशीर ठरतं. तसंच मित्रांनो आपण भरपूर पाणी देखील प्यायला पाहिजे. याने आपल्या शरीरातील प्रॉक्सीस निघून जायला मदत होते. तर मित्रांनो आपण आपली त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवणे हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

गजकर्ण इतरांना होणार नाही यासाठी घ्यायची काळजी

गजकर्ण आपल्या घरातील इतरांना पसरू नये त्यासाठी एकमेकांच्या वस्तू वापरणे हे टाळलं पाहिजे गजकर्णावरचे आपण डॉक्टरांचे उपाय करत आहोत ट्रीटमेंट असतील यादेखील पूर्ण करणे गरजेचे असते कारण आपण बहुतांश वेळा डॉक्टर कडे जातो आणि आपलं गचकरण राहिलं की आपण ट्रीटमेंट पूर्ण करत नाही पण गजकर्ण मुळातून आपल्याला घालायचा असेल तर पूर्ण ट्रीटमेंट घेणे अत्यंत गरजेचे आहे या पोस्टमध्ये आपण ज्या काही गोष्टी सांगितल्या या गोष्टी घरगुती उपाय आहेत. तुम्ही डॉक्टर कडे देखील जा आणि हे उपाय देखील करा तुम्हाला गजकर्ण लवकर बरा होण्यास मदत होईल.

तर मित्रांनो गजकरण क्रीम किंवा गचकरण औषध मलम अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही स्वतः खरेदी करू नका कारण तुम्हाला इतर प्रॉब्लेमला देखील सामोरे जाऊ शकते तर तुमच्या डॉक्टरच्या साह्यानेच गजकर्ण क्रीम औषधे मलम खरेदी करा.
फ्री पोस्ट तर मला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून कोणच्या प्रकारच्या आजारावर किंवा कोणत्याही इन्फेक्शन वर पोस्ट पाहिजे हे सुद्धा नक्की सांगा धन्यवाद.

शेअर मार्केट मार्गदर्शन आणि शेअर मार्केट मराठी पीडीएफ

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi